प्रदेश तेली महासंघ चोपडा तालुका युवक अध्यक्षपदी महेंद्र चौधरी*

 प्रदेश तेली महासंघ चोपडा तालुका युवक अध्यक्षपदी  महेंद्र चौधरी




चोपडा,दि.२१(प्रतिनिधी)* -प्रदेश तेली महासंघ चोपडा तालुका युवक अध्यक्षपदी श्री महेंद्र आनंदराव चौधरी यांची निवड करण्यात आल्याची माहिती प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हाध्यक्ष श्री के.डी. चौधरी यांनी दिली.   20 ऑक्टोबर 2022 रोजी एरंडोल येथे प्रदेश तेली महासंघ एरंडोल तेली समाजाच्या वतीने श्री आनंदा भगत चौधरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थी, गुणीजनांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रदेश तेली  महासंघ नाशिक विभागीय कार्याध्यक्ष श्री प्रशांत सुरडकर व जळगाव जिल्हा प्रदेश तेली महासंघ युवा पश्चिम अध्यक्ष श्री सुनील चौधरी यांच्या संमतीने महेंद्र चौधरी यांची युवा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.  त्यांच्या या निवडीबद्दल माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते महेंद्र चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एरंडोल तालुका अध्यक्ष गुलाब चौधरी, सचिव आर.डी. चौधरी, विभागीय कार्याध्यक्ष अशोक चौधरी, महिला जिल्हाध्यक्ष निर्मलाताई चौधरी महिला उपाध्यक्ष भारती चौधरी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रामचंद्र चौधरी, चोपडा तेली समाजाचे उपाध्यक्ष तुकाराम एम. चौधरी, चोपडा तालुका प्रदेश तेली महासंघाचे अध्यक्ष प्रशांत सुभाष चौधरी, प्रकाश चौधरी, ज्ञानेश्वर नेरकर, धरणगाव तालुका अध्यक्ष रतिलाल चौधरी, पाचोरा तालुका अध्यक्ष सतीश चौधरी, आदींनी अभिनंदन केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने