राष्ट्र विकासात बचत गटांची भूमिका निर्णायक : प्रा.डॉ.विनोद रायपुरे

 *राष्ट्र विकासात बचत गटांची भूमिका निर्णायक : प्रा.डॉ.विनोद रायपुरे*

चोपडा,दि.२१(प्रतिनिधी): कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी विकास विभाग आणि महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. एन. एस. कोल्हे उपस्थित होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून समाजकार्य विषय अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. विनोद रायपुरे , प्रा. डॉ. आर. आर. पाटील, प्रा. बी. एच. देवरे  उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. शैलेश वाघ हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे परिचय व प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. शैलेश वाघ यांनी केले. 

         या व्याख्यानाप्रसंगी 'महिला सक्षमीकरणामध्ये व राष्ट्र विकासामध्ये स्वयं सहाय्यता गटांची भूमिका' या विषयावर बोलतांना प्रा. डॉ. विनोद रायपुरे यांनी 'महिला सक्षम झाल्यास देश सक्षम होईल, स्वयं सहाय्यता बचत गटांच्या माध्यमातून देशातील महिला वैयक्तिक, सामाजिक व देश विकासामध्ये महत्वपूर्ण योगदान देत असल्याचे मत त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.'

        दुसऱ्या सत्रात डॉ. आर. आर. पाटील यांनी स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेतांना या विषयावर बोलतांना, भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास सांगून संविधानातील मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य स्पष्ट करून सांगितले. तसेच राष्ट्र विकासात व्यक्तिगत स्वातंत्र्य, सामाजिक स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय स्वातंत्र्याची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तिसऱ्या सत्रात प्रा. देवरे यांनी लोकशाहीचे महत्व या विषयावर विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.                                 अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन. एस. कोल्हे म्हणाले की, देशातील नागरिकांचे विशेष अधिकारांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सर्व नागरिकांची असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी सामुदायिक प्रयत्न केले पाहिजे. स्वातंत्र्याशिवाय व्यक्तिविकास अशक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

          या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. डी. डी. कर्दपवार यांनी केले तर आभार महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. पी. एम. रावतोळे यांनी मानले. यावेळी मोठ्या प्रमाणात प्राध्यापक बंधू-भगिनी, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने