सौ रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयात स्व. ओंकार आप्पा पाटील यांचा स्मृतिदिन संपन्न

  

सौ रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयात स्व. ओंकार आप्पा पाटील यांचा स्मृतिदिन संपन्न 


भडगाव दि.२०(प्रतिनिधी):  सौ रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयात स्वर्गीय ओंकार आप्पा पाटील यांचा स्मृतिदिन संपन्न 

स्वर्गीय ओंकार आप्पा पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त भडगाव महाविद्यालयात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या दिनानिमित्त महाविद्यालयात खानदेशचा ढाण्या वाघ ओंकार आप्पा पाटील या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रीना शिवाजी महाजन द्वितीय क्रमांक तनुजा देविदास महाजन तृतीय क्रमांक भावना रोहिदास बोरसे यांना मिळाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन.एन.गायकवाड हे होते तर डॉ.डी.एम.मराठे डॉ. चित्रा पाटील प्रा.देसले हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बी. एस.भालेराव यांनी केले तर आभार प्रा.देसले यांनी मानले सभेला बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने