शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाने त्वरित मान्य कराव्यात: थोर विचारवंत टी.एम. चौधरी

 शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाने त्वरित मान्य कराव्यात: थोर विचारवंत टी.एम. चौधरी 


चोपडा,दि.२७(प्रतिनिधी)*- श्री संताजी जगनाडे समस्त तेली  समाज चोपडा, महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा व प्रदेश तेली  महासंघ चोपडा यांचे संयुक्त विद्यमाने  शेतकरी, शेतमजूर व जवान यांचा गौरव समारंभ तेली समाज मंगल कार्यालय संत श्री संताजी  जगनाडे महाराज मंदिर श्रीराम नगर चोपडा येथे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त निवृत्त मुख्याध्यापक व थोर विचारवंत श्री तुकाराम मंगा चौधरी यांचे अध्यक्षतेखाली व प्रदेश तेली महासंघाचे  जिल्हाध्यक्ष  के.डी. चौधरी यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. 

यावेळी  सुनील पांडुरंग चौधरी, प्रकाश श्रावण चौधरी, देवकांत के चौधरी, ज्ञानेश्वर आप्पा नेरकर, श्री नारायण पंडित चौधरी, श्री प्रशांत सुभाष चौधरी, सूर्यकांत के. चौधरी, यांच्या हस्ते प्रत्यक्ष शेतात राबराब राबणारे शेतकरी बापू श्रावण चौधरी, राजेंद्र गणपत चौधरी ,जगदीश जुलाल मिस्त्री तसेच जवान धनराज प्रल्हाद मराठे, जवान रामचंद्र आनंदा चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा या संस्थेला आदर्श शिक्षक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आनंदा कौतिक चौधरी व त्यांच्या  धर्मपत्नी सौ. कासुबाई आनंदा चौधरी यांनी एक लाख 13 हजार रुपये देणगी दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला .तसेच सुभाष चिंधु चौधरी बोरणार, लोटन नथू  चौधरी चोपडा हल्ली मुक्काम पुणे यांनी प्रत्येकी 11000 रुपये देणगी  दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. प्रदेश तेली महासंघ चोपडा तालुका युवक अध्यक्षपदी महेंद्र कुमार आनंदराव चौधरी यांची निवड झाल्याने त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आपल्या अवध्यक्शीय भाषणात थोर विचारवंत टी. एम. चौधरी आपले विचार व्यक्त करताना शेतकऱ्यांचा जवानांचा कार्याचा गौरव केला.  शेतकरी अनेक संकटांना सामोरे जात असताना शासन शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात रस दाखवत नाही. निसर्ग सातत्याने बदलत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी असताना शेतकरी सुखी नाही. यासाठी शासनाने  शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित मंजूर करून शेतकऱ्याला आधार दिला पाहिजे.ही शाशनाची जबाबदारी आहे. शेतकरी सुखी तर देश सुखी तेव्हा शासनाने दिरंगाई न करता शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. अशी एकमुखी मागणी त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.  यावेळी संताजी प्रतिष्ठान चे अध्यक्ष देवकांत के. चौधरी व प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष के. डी. चौधरी यांच्याही कार्याचा गौरव  त्यानी केला.  के.डी. चौधरी यानी  संस्थेच्या कार्याचा परिचय करून दिला व महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवकांत के. चौधरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले .कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्तीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून माल्यार्पन करण्यात आले.  त्यानंतर शेतकऱ्यांचे नागर या शेतीतील प्रमुख  अवजाराचे श्रद्धापूर्वक पूजन करून माल्यार्पन करण्यात आले. संताजी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश श्रावण चौधरी, प्रदेश तेली महासंघ चोपडा तालुका अध्यक्ष श्रीvg प्रशांत सुभाष चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.  महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठानचे सूर्यकांत के. चौधरी यानी आपल्या प्रास्ताविक भाषणात बलिप्रतिपदेचे महत्त्व विशद केले. प्रकाश चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने