*सुरमाज फाउंडेशनच्यावतीने आत्मनिर्भर महिलांचा सत्कार*
चोपडा दि.२७( प्रतिनिधी) फेब्रुवारी 2022 मध्ये सूरमाज फाउंडेशन च्या वतीने *स्किल इंडिया डेवलपमेंट फॉर वूमेन* ही योजना सुरू करण्यात आली होती त्याअंतर्गत 25 ऑक्टोबर 2022 रोजी काही महिलांनी टेलरींग कोर्स उत्तम प्रकारे पूर्ण केला आहे त्यांचा सूरमाज फाऊंडेशनने नुकताच सन्मान करण्यात आला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात तिलावते कुराण पाकने करण्यात आली तसेच संचालन डॉ.एम.डी.रगीब साहिब यांनी केले तर शिवलेले कपड्यांचा उघडण्यासाठी प्रशिक्षक शमीम तेली साहिबा यांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अतिथी शेख मुजाहिद-ए-इस्लाम यांनी सांगितले की, आपणही महिलांना स्वयंभू बनवायला हवे. जे हाजी उस्मान शेख (अध्यक्ष सूरमज फाऊंडेशन) यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला, त्याच बरोबर कार्यक्रमात उपस्थित सर्व लोकांनी शिवलेल्या कपड्यांचे व कार्यक्रमात उपस्थित सर्व पाहुण्यांचे कौतुक केले आणि ठेकेदार आरिफ कॉन्ट्रॅक्टर साहेब, सामाजिक कार्यकर्ते आरिफ भाई अबुलैस शेख चे डॉक्टर मोहम्मद जुबेर शेख यांनी सूरमाज फाउंडेशनचे वतिने सर्वाचं आभार मानले