जयसिंग वाघ यांचा फैजपुर येथे सन्मान

 जयसिंग वाघ यांचा फैजपुर येथे सन्मान

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

जळगाव,दि.२०(प्रतिनिधी) :-  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व धनाजी नाना महाविद्यालय , फैजपुर तर्फे भारतिय स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित खुल्या गटातिल निबंध स्पर्धेत प्रथम पारितोषिक विजेते जळगाव येथील साहित्यिक जयसिंग वाघ यांचा १९ ऑक्टोबर रोजी फैजपुर येथील धनाजी नाना महाविद्यालयात मानचीन्ह , प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला

           उमवि जळगाव चे कुलगुरु डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या मुख्य उपस्थितित आमदार शिरीषदादा चौधरी यांनी वाघ  यांचा यथोचित सन्मान केला

            कार्यक्रमास प्रा  डॉ  संतोष चव्हाण , भरतदादा अमळकर , प्रचार्य डॉ पी. आर. चौधरी , तापी परिसर विद्या मंडळ , फैजपुर चे संचालक मंडळ , प्रा  डॉ  जगदीश पाटील , प्रचार्य डॉ  व्ही  आर  पाटिल उपस्थित होते

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा  राजश्री नेमाड़े , यांनी तर आभार प्रदर्शन प्रा कल्पना पाटिल यांनी केले कार्यक्रमास प्राध्यापक वर्ग , कर्मचारि वर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संखेने हजर होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने