पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल 'एज्युकेशन वर्ल्ड इंडिया अवॉर्ड' ने सन्मानित

 पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल 'एज्युकेशन वर्ल्ड इंडिया अवॉर्ड' ने सन्मानित

चोपडा,दि.२०( प्रतिनिधी ):--  एज्युकेशन वर्ल्ड ही संस्था देशभरातील सी.बी.एस.ई. स्कूलला पुरस्कार देत असते. या पुरस्कारासाठी वेगवेगळ्या निकषांची पूर्तता करणे आवश्यक असते. EW इंडिया स्कूल रँकिंग दरवर्षी एज्युकेशन वर्ल्ड इंडिया स्कूल रँकिंग जाहिर करते.  यावर्षी २०२२ - २३ साठी देशभरातील ४००० सी.बी.एस.ई. शाळांनी सहभाग नोंदविला होता.सदर पुरस्कार सी. बी. एस. ई. शाळांसाठी प्रतिष्ठेचा मानला जातो. 

 पी. जी. पी. एस. ला भारतातील सह-शिक्षण बोर्डिंग स्कूल श्रेणीमध्ये ६२ वा क्रमांक आणि महाराष्ट्रात ६ वा क्रमांक मिळाला आहे.         

     'एज्युकेशन वर्ल्ड इंडिया स्कूल अवार्ड' २०२२ - २३ या शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या या पुरस्काराने शाळेला सन्मानित करण्यात आले आहे. हा भव्य सोहळा नवी दिल्ली येथील गुरुग्राम हॉटेल लीला अँम्बियन्स मध्ये पार पडला. शाळेच्या वतीने पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संचालक पंकज बोरोले,  प्राचार्य  मिलिंद पाटील यांनी डॉ कन्नन गिरीश डायरेक्टर, लिव्ह  लाईफ  फौंडेशन व   दामोदर गोयल प्रेसिडेंट भारतीय निवासी शाळा संघटना  यांच्या उपस्थितीत पुरस्कार स्वीकारला.

        पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक पंकज बोरोले, एम. व्ही. पाटील, व्ही. आर. पाटील, प्राचार्य डॉ आर. आर.अत्तरदे, प्राचार्य मिलिंद पाटील,  सौ. रेखा पाटील,प्राचार्य गणेश साळुंखे यांनी अभिनंदन व कौतुक केले . सदर पुरस्कारामुळे शाळेचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे....

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने