..अखेर त्या दिव्यांग महिलेचे आत्मदहन आंदोलन स्थगित.. समाज बांधवांच्या मध्यस्थीने घरकूल चे मोजमाप सुरू..!
पाचोरा दि.२०(प्रतिनिधी राजेंद्र खैरनार)साजगाव(बिल्दी) येथील मंजुर झालेलं "घरकुल" मिळत नसल्याने आत्मदहन आंदोलनाचा इशारा देणाऱ्या दिव्यांग आदिवासी महिलाने समाज बांधवांच्या मध्यस्थी मुळे घरकुल प्रश्न मार्गी लागल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
पाचोरा तालुक्यातील साजगाव(बिल्दी) येथील विधवा आदिवासी कोळी समाजाची महिला ग.भा.कलाबाई सुभाष कोळी ह्यांचे ग्रामपंचायत प्रलंबित असलेले घरकुल मिळत नसल्याने त्यांनी १८आक्टों२०२२ ला पाचोरा पंचायत समिती समोर करणार "आत्मदहन" करण्याचा इशारा दिला होता. त्याअनुषंगाने,,कोळी समाजाचे श्री.सुनीलभाऊ कोळी रा.बांबरुड(पत्रकार),तसेच राजेंद्र खैरनार (पत्रकार), सौ.कविताताई कोळी धुळे यांनी तसेच सुनिल मोरे , संभाजी दादा शेवरे, विजय बागुल (फौजी) सर्वांनी तसेच, जेष्ठ मंडळीशी मिळुन अन्याग्रस्त महिलेला घरकुल काय कारणाने मिळत नाही हे जाऊन जाणुन घेऊन बीडिओंशी चर्चा करून परिस्थितीतील गैरसमज दूर करून कलाबाई कोळी,मुलगा रविंद्र कोळी यांना समज देत आत्मदहन आंदोलन मागे घेऊन घरकूल प्रश्न मार्गी लावून सदरील घरकुल जागेचे मोजमाप प्रशासकीय स्तरावर करून घेतले. याप्रसंगी सुनिल भाऊ मोरे ,संभाजीदादा शेवरे राजेंद्र खैरनार , संरप़च समाधान सोनवणे, उपसरपंच पती विशाल पाटील, पोलिस पाटील , बिडीओ श्री खस ग्रामसेविका सौ.अरूणा राठोड, शिपाई राजु भाऊ कोळी तसेच ग्रामपंचायत सदस्य गुरुलाल पवार , गावकरी उपस्थित होते .