ॲन्टिकास्ट बाइकर्सला सावळदे येथे अडकाव
त-हाडी, ता.शिरपूर .दि 2( प्रतिनिधी ज्ञानेश्वर सैंदाणे ): शिरपूर -मेहेरगाव ते धुळे निघालेल्या ॲन्टिकास्ट बाइकर्स मार्चला सावळदे येथे अडकाव करण्यात आला.खालचेगाव डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथुन निघालेला मार्च शहरातील विजयस्तंभ ते शहरातून अमोदा गावावरून हायवे ने धुळ्याकडे प्रस्थान केले.यावेळी मार्चला संबोधित करताना देश स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करत आहे आणि एकीकडे देशात दलित, आदिवासी, अल्पसंख्याक यांच्यावर हल्ले दिवसेनदिवस वाढतच आहे.मेहेरगाव येथील घटना हे त्यांचे द्योतक आहे.गावातील उच्च जात वर्गीय समुह जेव्हा दलित म्हणून एका समुहावर बहिष्कार टाकून दैनंदिन व्यवहारावर बंदी लादली आणि सात दिवस उलटल्यावर देखील प्रशासन बघ्याची भुमिका घेत आहे हे कृत्य निषेधार्थ आहे असे सत्यशोधक विद्यार्थी संघटना राज्य सदस्य सतिष खैरनार यांनी निवेदन देताना मांडले.प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे दलित तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या तसेच प्रशासनाने भयभीत झालेल्या दलित वस्त्यांना आणि तरूणांना संरक्षण द्यावे असे माजी उपजिल्हाधिकारी जी.के मंगळे यांनी मांडले.पुरोगामी महाराष्ट्रात खैरलांजी -खर्डा-नाणेगाव येथील घटना ह्या जातीवादी शक्तींची पाठराखण करून पोशल्या गेल्या आणि त्यामुळेच मेहेरगाव सारख्या घटना आज घडत आहेत.या शक्तींचा अडकाव जर प्रशासन कडून होत नसेल तर जनआंदोलन उभं करण्यासाठी सत्यशोधक जनआंदोलन तयार आहे असे ज्वाला मोरेंनी सांगितले.यावेळी शाहीर प्रविण पाणपाटील,विजय अहिरे,गौतम अहिरे, अनिल खैरनार, आनंद निकम, विलास पाटोळे,मनोहर मोरे यांनी क्रांती गीते सादर केली.पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख साहेब यांना निवेदन देताना कॉ.दत्ता थोरात सत्यशोधक जनआंदोलन महाराष्ट्र,गणेश सावळे, पिंटू शिरसाठ, ॲड.युवराज ठोंबरे,दिपक भिल,रमेश वानखेडे,राजू गुजराथी,बाबुदादा खैरनार,विजय खैरनार, गोविंदा थोरात, सिद्धार्थ बैसाणे, विनोद आगळे,गोविंदा खैरनार,प्रा.प्रज्ञामित्र बि-हाळे,प्रा.अरुण पवार,सोनाली पवार, शशिकांत बैसाणे, रविंद्र मोरे,साहेबराव पवार, यशवंत मंगळे,अजय मंगळे,भाऊसाहेब थोरात,अशोक मंगळे हे निवेदन देण्याप्रसंगी होते.बाळा पवार, देवानंद थोरात,मनोहर बि-हाळे,सुनिल थोरात, कचरू अहिरे, रावसाहेब अहिरे, श्रावण पाटोळे,सागर थोरात,राजू संदाशिव,भैय्या अहिरे, किरणं अहिरे,पी.के अहिरे,प्रेमराज निकम,संदिप वानखेडे, गौतम खैरनार,अभिलाष महाले, गौतम मोरे, विलास पाटोळे,आबा मोरे,नाना करंकाळ,अक्षय शिरसाठ, हेमंत ढिवरे, सचिन निकुंभे, पंकज निकम, राकेश भावसार, खुशाल अहिरे, विनोद गायकवाड, कैलास सोनवणे,सनी मालची सर्व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.
