चोपड्यात २८ रोजी ʼकिस्से स्वरलतेचेʼ - मसाप तर्फे आयोजन

 चोपड्यात २८ रोजी ʼकिस्से स्वरलतेचेʼ - मसाप तर्फे आयोजन

चोपडादि.२७(प्रतिनिधी) - येथील महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या चोपडा शाखेतर्फे भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त 'किस्से स्वरलतेचे' या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

         स्व. लता मंगेशकर यांच्या जयंतीदिनी दि. २८ सप्टेंबर, बुधवारी रात्रौ ८.३० वाजता लता मंगेशकर यांचे निस्सीम चाहते असलेले मधुकर पाटील (जळगाव) यांच्यासोबत स्व. लतादीदी यांच्या जीवनातील प्रसंग, आठवणींवर आधारित गप्पांचा कार्यक्रम यावल रोडवरील देशमुख नगर येथील शारदा मॅथ्स क्लासेस येथे होणार आहे. याप्रसंगी अजरामर व्यक्तिमत्व लता मंगेशकर यांच्या अनोख्या पैलूंशी संबंधित या सुश्राव्य किस्से तथा गप्पांच्या कार्यक्रमास रसिकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन मसाप चोपडा शाखेतर्फे संस्थापक अध्यक्ष अशोक सोनवणे, कार्याध्यक्ष विलास पाटील, प्रमुख कार्यवाह संजय बारी यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने