लोटाई माता मंदिर ट्रस्टची नविन कार्यकारिणी गठित
चोपडा दि.२८(प्रतिनिधी): तालुक्यातील चहार्डी धुपे जवळील लोटाई माता मंदिरावर आज दिनांक २६ रोजी जनरल सभा घेण्यात आली होती अध्यक्षस्थान मोहन पुंडलिक सोनवणे यांनी भुषविले
सदरील विश्वस्त मंडळाची निवड पाच वर्षे करीता झाली असुन आज मंदिर स्ट्रस्ट ज्यांचे मुळे उभे राहिले ते संस्थापक अध्यक्ष आदरणीय आण्णासाहेब पांडुरंग सोनु सोनवणे (अमळनेर) यांची फेरनिवड अध्यक्ष म्हणून करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून धनराज महादू सोनवणे (नाशिक) रमेश एकनाथ सोनवणे सचिव (पारोळा) म्हणून निवड करण्यात आली तर खजिनदार म्हणून दिलीप बाबुराव सोनवणे (जळगाव)तर खालिल प्रमाणे विश्वस्त म्हणून निवड झालेल्या चि नावे अशी छगन कनाशी सोनवणे (बुर्झेड ) नारायण तानिराम सोनवणे (जळगाव) शामसुंदर हनुमंत सोनवणे (पत्रकार हातेड) देविदास बाबुराव सोनवणे (चोपडा) सुभाष पंढरीनाथ सोनवणे (बडोदा गुजरात) प्रमोद दिगंबर सोनवणे (कल्याण) सौ.भारती संजय सोनवणे(अमळनेर)तर रविंद्र शामराव पाटील सर (चहार्डी) जागा मालक कायम निमंत्रित सदस्ययांची निवड करण्यात आली तर सदरील सभा यशस्वी करणेसाठी पृथ्वीराज आत्माराम सोनवणे किरण आत्माराम सोनवणे तुळशिराम माणिक सोनवणे यांचे सहकार्य लाभले