टोकरे कोळी समाजाला जात प्रमाणपत्राबाबत अडचण.. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे समाजाच्या शिष्टमंडळाची एक बैठक घेण्याचे मंत्र्याचे आश्वासन

 टोकरे कोळी समाजाला जात प्रमाणपत्राबाबत अडचण.. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे समाजाच्या शिष्टमंडळाची एक बैठक घेण्याचे मंत्र्याचे आश्वासन

चोपडा दि.२८(प्रतिनिधी)टोकरे कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्राबाबत येत असलेल्या अडचणी सोडविण्यासाची मागणी  ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या कडे केली.मंत्री महाजन व खा.उन्मेष पाटील यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित बैठकीनंतर प्रभाकर सोनवणे यांच्या सह  समाजातील नेत्यांनी मंत्री महाजन यांची भेट घेतली.टोकरे कोळी समाजाचे जात प्रमाणपत्र असतांनाच कर्मचाऱ्यांना अधिसंख्य ठरविण्यात येत आहे.जात पडताळणी समितीने टोकरे कोळी जात प्रमाणपत्रबाबत सकारात्मक किंवा नकारात्मक निर्णय सहा महिन्यांच्या आत द्यावा.जात पडताळणी समिती कार्यालय नंदुरबार येथे गेल्यानंतर जात पडताळणी बाबत अडचणी येत आहेत.त्याचप्रमाणे प्रांताधिकारी यांचेकडून देण्यात आलेल्या टोकरे कोळी जात प्रमाणपत्रावर टोकारे कोळी असा चुकीचा उल्लेख आला आहे त्यामुळे जात पडताळणीसाठी अडचणी येत आहेत.त्या अनुषंगाने समाजाच्या शिष्टमंडळासोबत प्रांताधिकाऱ्यांची बैठक घेण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचना द्यावी अशी मागणी केली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने