अंबाजोगाई दि.०४ (प्रतिनिधी संजय लोहिया)- शिवसेनेला धोका देऊन आमदार गेले असले तरी महाराष्ट्रातील अठरापगड जाती,धर्मातील सर्वसामान्य माणूस पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा असून ते आगामी निवडणुकीत सिद्ध होईल असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी येथील बैठकीत व्यक्त केले
यावेळी व्यासपीठावर माजलगाव उपजिल्हाप्रमुख रामराजे सोळंके, अंबाजोगाई शहर प्रमुख गजानन मुडेगावकर,माजी उपजिल्हाप्रमुख राजेभाऊ लोमटे,माजी तालुकाप्रमुख बाबासाहेब पांडे, तालुका समन्वयक बालासाहेब शेप,मदन परदेशी, माजलगाव चे उपतालुकाप्रमुख अतुल उगले,दासु पाटील दाभाडे, नामदेव सोजे आदींची उपस्थिती होती
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव जी ठाकरे साहेब, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार मराठवाडा समन्वयक विश्वनाथ जी नेरूरकर, मराठवाडा नेते चंद्रकांत खैरे साहेब, संपर्क प्रमुख धोंडु पाटील साहेब,सह संपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे साहेब,केज मतदार संघाचे संपर्क प्रमुख परशुराम जाधव यांच्या सुचनेनुसार व जिल्हा प्रमुख आप्पा साहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली व प्रमुख उपस्थितीत आज दिनांक 3/9/20220 शनिवार रोजी सकाळी 11.00वाजता शासकीय विश्रामगृह येथे महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना आप्पासाहेब जाधव म्हणाले आगामीसर्व निवडणुकीत आपण सर्व ताकदीनिशी लढणार आहोत पदाधिकारी पेक्षा लोकप्रतिनिधी कसे होता येईल याकडे शिवसैनिकांनी लक्ष दिले पाहिजे, आगामी काळात आपल्या पक्षाची सत्ता पुन्हा येणार असून सर्व गट तट सोडून पक्ष कसा मोठा करता येईल हे शिवसैनिकाच कर्तव्य आहे असे सांगितले.
या बैठकीला महिला आघाडी च्या जयश्रीताई पिंपरे,रेखाताई घोबाळे,ऍड.सुनीता जोशी,जयश्री ताई मोरे, उपतालुकाप्रमुख वसंत माने,नागेश कुंभार,शहर समन्वयक अर्जुन जाधव, उपशहरप्रमुख शिवकांत कदम,शहर संघटक रत्नेश्वर वाघमारे, नागेश सावंत, युवासेनेचे अभिमन्यू वैष्णव, अॅड.विशाल घोबाळे,रमेश टेकाळे,बाळासाहेब वाघाळकर,अशोक हेडे,संतोष काळे, सुहास मोहिते, जालिंदर आपेट, सुधाकर काचरे,भागवत लाखे, गणेश मोरे, अनिरुद्ध पांचाळ, वैजनाथ सोनवणे,मोरेवाडी चे माजी सरपंच मारोती मोरे, धर्मराज मोरे,राम मगर, विष्णू धायगुडे, शिवनारायण गुजर, संभाजी शिंदे,निकम, विशाल कुलकर्णी,रवी मुंडे गावकर,हुसेन शेख,उत्तम कुंडगर,देवमाने यांच्या सह सर्व आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी बन्सी आण्णा जोगदंड,मदनलाल परदेशी, बालासाहेब शेप, बाबा भिसे आदींनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक गजानन मुडेगावकर तर आभार अक्षय भुमकर यांनी मानले

