आठवडा बाजार हा "भारत डेअरी ते वाघ डेअरी" पर्यत सरळ वाहतूकीसाठी मोकळा करा..न.पा.प्रशासनाकडे जनतेची मागणी

 

  आठवडा बाजार हा "भारत डेअरी ते वाघ डेअरी" पर्यत सरळ वाहतूकीसाठी  मोकळा करा..न.पा.प्रशासनाकडे जनतेची मागणी


पाचोरा दि.४( प्रतिनिधी  राजेंद्र खैरनार)दर शनिवारी पाचोरा आठवडे बाजार हा भरत असतो गेल्या अनेक दिवसांपासून तो नियमितपणे भरत असून नुकताच कृष्णापुरी पुलाचे काम मार्गी लागले व वाहतूक सुरळीत सुरू झाली परंतु दर शनिवारी खेड्या पाड्यातुन येणारे तसेच स्थानिक व्यावसायिक हे पुलावर तसेच भारत डेअरी पासून ते वाघ डेअरी पर्यत आजूबाजूला बसतात तसे पाहिले तर रस्त्याच्या दोन्ही बाजूस आठवडे बाजार कडे जाणारा रस्ता तसेच कोंडवाडा कडे जाणारा रस्ता पूर्णपणे मोकळा असताना भारत डेअरी ते वाघ डेअरी हा रस्ता पूर्ण जाम होत असते तरी नगरपालिका प्रशासनाने ह्याकडे लक्ष देऊन रस्ता मोकळा करण्याकामी सहकार्य करावे कारण येणारे जाणारे महिला,वृद्ध, व इतर नागरिक यांना तसेच   वाहनांना नाहकस त्रास होतो, यामुळे कुणाला धक्का बसला, कमी-जास्त प्रमाणात अपघात टाळण्यासाठी,तसेच लहान शाळेचे विद्यार्थी पायी/सायकली ने प्रवास करतात   तरी संभाव्य अपघाते टाळण्यासाठी प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन सहकार्य करावे हीच अपेक्षा स्थानिक रहिवासी तसेच ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांमध्ये चर्चीले जात आहे,तरी नगरपालिका प्रशासन काय प्रक्रिया करतात याकडे ते सर्वांचे लक्ष वेधून आहे,,व लवकरच यावर उपाय करतील अशी आशा बाळगत आहेत....

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने