प्रशासक साहेबांनो..! गटार नसल्याने पाणी रस्त्यावर.. घाणीच्या साम्राज्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात ?
चांदवड,दि.०४ (तालुका प्रतिनिधी सुनील अण्णा सोनवणे) चांदवड नगरपरिषदला गेले अडीच वर्षांपासून प्रशासक राज्य आहे.अनेक समस्यांचा पाऊस पडत असताना समस्या मार्गी का लागत नाही? असा प्रश्न नागरिकांना पडलाय.चांदवड नगरपरिषद मागील अवघ्या 50 फुटावर असलेल्या काँक्रीट रोडवर सकाळपासून अतिशय घाणेरडे टॉयलेटचे,अंघोळीची पाणी गटार नसल्याने रस्त्यावरून वाहते.याबाबत काही नागरिक वारंवार नगरपरिषदकडे पाठपुरावा करताना दिसतात,यास कारणही तसेच आहे की शाळकरी मुले,महिला वर्ग,व्यापारी याच घाणेरड्या पाण्यातून रोज ये जा करतात.विशेष बाब म्हणजे प्रशासक साहेब,मुख्याधिकारी, अभियंते,कर्मचारी याच मार्गाने नगरपरिषदेत येतात मात्र यांना हे घाण वाहणारे पाणी दिसतच नसावे का?असा प्रश्न नागरिकांना पडलाय.
याच भागात उर्दू हायस्कूल दगडी शाळा गुंजाळ विद्यालय नेमिनाथ जैन विद्यालय या ठिकाणी विद्यार्थ्यांची ये जा चालू असते वरच्या गावात गावातून बस स्टँड कडे जाणारा शॉर्टकट रस्ता हाच असून या रस्त्याने नेहमीच वर्दळ असते जेआरजी विद्यालयाजवळ एक डीपी असून त्या ठिकाणी तारा सुद्धा लोंबकळत रस्त्यापर्यंत आलेले आहेत विद्युत विभाग काय काही अप्रिय घटना घडण्याची वाट बघत आहे का? असा संतप्त सवाल नागरिक व विद्यार्थ्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केला.
तसेच लेंडी नाल्याजवळ आत्ताच नवीन पुलाचे बांधकाम झाले आहे परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे साईड गार्ड रस्त्याच्या कडेला बसवलेले नाहीत या कडे तरी नगरपरिषद सीईओ साहेब आपण लक्ष द्याल काय?
काही दिवसांपूर्वी चोरांचा सुळसुळाट बस स्टँड परिसरातील कॉलण्यांमध्ये झाला असून गुजराथी नगर पाण्याच्या टाकीजवळील काही भागात स्ट्रीट लाईट नसून याबाबत स्थानिक नागरिकांनी ट्युबुलर पोल बसवून स्ट्रीट लाईट पुरविण्यात यावी अशी मागणी नगरपरिषदला केली तरी अजून टेंडर झाले नाही अशीच उत्तरे दोन वर्षांपासून मिळतात,नागरिकांना सोयीसुविधा मिळत नसतील तर प्रशासक काळात नेमके काय साध्य झाल?हा विचार शहरातील सुजाण नागरिकांनी निश्चित करावा.
