आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन,,,!

 


*आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन,,,!

पाचोरा,दि.३  (प्रतिनिधी श्री राजेंद्र खैरनार)कृष्णापुरी भागातील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत असून त्यास आमदार फंडातून 17 लाख रुपये निधी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडून मिळाला असून लवकरच कामास सुरुवात होणार आहे , त्यानिमित्ताने आज आमदार साहेबांच्या हातून भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला , कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील, प्राध्यापक राजेंद्र चिंचोले सर मंडळाचे अध्यक्ष प्रेमनारायण  तिवारी, व सर्व सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी कृष्णापुरी ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते, कार्यक्रमात देवी मंदिर ट्रस्ट द्वारा नागरिकास आव्हान करण्यात आले कि मंदिराच्या कामास यथाशक्तीने मदत करण्यात यावी, आज भूमिपूजनाच्या दिवशी शरद ट्रेडिंग कंपनीचे संचालक दिनेश शेठ अग्रवाल यांनी 51 हजार रुपये देऊन सुरुवात केली ,

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने