भडगाव महाविद्यालयात हिंदी सप्ताहाचा समारोप

 भडगाव महाविद्यालयात हिंदी सप्ताहाचा समारोप

भडगाव,दि.२८(प्रतिनिधी)- येथील सौ.र.ना देशमुख महाविद्यालयात हिंदी विभाग व ग्रंथालय विभागा च्या संयुक्त विद्यमाने दि. १४ ते२१ सप्टेंबर दरम्यान हिंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते त्यात गीत व काव्य वाचन, पोस्टर, निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एकुण 59 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

१४ सप्टेंबर रोजी कार्यक्रमाचे उद्घाटन कला व वाणिज्य विभागाचे समन्वयक डॉ.संजय भैसे यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एस.आर.पाटील हे होते 

दि.१६  सप्टेंबर २०२२ रोजी काव्य वाचन स्पर्धा संपन्न झाली. कार्यक्रमाचे परीक्षक व प्रमुख पाहुणे प्रा ए.एम . देशमुख तर अध्यक्षस्थानी महाविद्याल याचे प्राचार्य डॉ एन एन गायकवाड होते. 

दि. १७ सप्टेंबर 2022 रोजी प्रा.अंकुश खोब्रागडे,  अक्कलकुवा (आर एफ एन एस वरीष्ठ विज्ञान महाविद्यालय) 

यांच्या हस्ते पोस्टर स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. डॉ एस.डी.भैसै होते. 

दि. १९सप्टेंबर रोजी निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी 36 विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

 दि. २१ सप्टेंबर रोजी बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.प्रमुख 

वक्ते प्रा जे.व्हि.पाटील, पाचोरा,प्रा.डाॅ. मधुकर खराटे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन.एन. गायकवाड होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ.एस.डी. भैसे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा स्नेहा गायकवाड यांनी केले तर सुत्रसंचलन ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा रचना गजभिये यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.चित्रा.एस. पाटील, प्रा.सुरेश कोळी, प्रा. देवेंद्र मस्की,प्रा स्नेहा गायकवाड,  प्रा. एस. एन. हडोळतीकर,   प्रा जनार्दन देवरे,प्रा‌.शिवाजी पाटील प्रा प्रदीप वाघ, श्री.राजेंद्र मराठे, व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने