प्रभू रामचंद्र मंदिर सचिवपदी अनिल सावंत यांची निवड...!
*पाचोरा दि.२८ (प्रतिनिधी श्री राजेंद्र खैरनार) तालुक्यातील अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सध्या मालन वसतिगृह पाचोरा ( त्र्यंबकनगर-कृष्णापुरी ) येथील वसतिगृह अधीक्षक व गजमल को-ऑप बॅंकेचे संचालक तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघ चे जिल्हासंघटक अनिल सावंत यांची प्रभू रामचंद्र मंदिर सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
श्रीयुत अनिल सावंत सर यांची पौराणिक, पुरातत्व व प्रख्यात प्रभू रामचंद्र मंदिर सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.