एन.मुक्ता शाखा भडगावतर्फे भारत मातेचे प्रतिमा पुजन
भडगाव,दि.28(प्रतिनिधी):- सौ.रजनीताई ना. देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात एन.मुक्ता शाखेतर्फे स्वातंत्राच्या अम्रृत महोत्सवा निमित्ताने जेष्ठ प्रा.डॉ.ए.एन. भंगाळे यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालया चे प्राचार्य डॉ.एन.एन.गायक वाड होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एस.आर पाटील यांनी तर सूत्रसंचालन प्रा. डी.ए. मस्की यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजनाची भूमीका प्रा.जी.एस.अहिरराव यांनी मांडली.आभार प्रा. डॉ. चित्रा पाटील यांनी व्यक्त केले
यावेळी प्रा.एल.जी.कांबळे प्रा.डॉ.एस.डी.भैसे,प्रा.डॉ. एन.व्ही.चिमणकर, प्रा. डॉ.एस.जी.शेलार, प्रा एम.डी. बिर्ला, प्रा.एस.एम झाल्टे, प्रा.एस.एन.हडोळती कर,प्रा.ए.एम.देशमुख,प्रा. शिवाजी पाटील,प्रा. आर.एम गजभिए,प्रा सुरेश कोळी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.