तापी नदी पुलावरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या..

 

तापी नदी पुलावरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या..

चोपडा दि.०१(प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यातील निमगव्हाण येथील तापी नदी पुलावरून उडी घेऊन चाळीस वर्षीय महिला विद्याबाई प्रल्हाद पाटील ह्यांनी आत्महत्या केल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली असून  हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास सदरील महिलेने तापी नदी पुलावरून उडी घेतली त्यावेळी आजूबाजूच्या परिसरात लोकांना धाव घेत नदीच्या पात्रात उड्या घेतल्या  महीलेला वाचविण्याचा प्रयत्न करत बाहेर काढले असता ती मयत झालेली आढळून आली . पोलिस पाटील पवन सुकदेव भील यांनी व गावकऱ्यांनी एका ट्ॕक्टरने चोपडा ग्रामीण रुग्णालयात आणलं व पोलीसात माहिती कळविली.ओळख परेड नंतर सदरील  मयत महीलेचे नाव विद्याबाई प्रल्हाद पाटील (वय४०वर्षे) असे असून ती दीर्घ आजाराने त्रस्त असल्याचे समजते. आजाराच्या त्रासाला कंटाळून तिने हे कठोर पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत चोपडा पोलिसांत पोलिस पाटील पवन भील यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद क्रं.३१/२०२२सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे करण्यात आली आहे पुढील तपास हे.कॉ. भरत नाईक हे करीत आहेत.मयत महिलेचे पती वर्डी हायस्कूलला शिक्षक म्हणून सेवेत आहेत ते मुळचे धरणगाव तालुक्यातील पिंपळेसिम येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली.मयताचे पश्चात पती व २ मुले आहेत . काहींचे असेही म्हणणे आहे की सदरील महिलेचा पाय घसरून मृत्यू झाला असावा तर काहींनी पूलावरून पडल्याचे म्हटले आहे याबाबत अधिक वृत्त प्राप्त होऊ शकले नाही.याबाबत रात्री उशिरापर्यंत घटना संभ्रमावस्थेत आहे.अधिक माहिती पोलिस तपासात समजेल असेही प्रत्यक्ष दर्शींचे म्हणणे आहे.या घटनेने सर्वत्र  हळहळ व्यक्त करण्यात येत आहे..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने