महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदस्य नोंदणी कार्यक्रम व महिला रोजगार प्रशिक्षण शिबिर संपन्न
चांदवड दि. ०१ ( प्रतिनिधी)महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी कार्यक्रम व महिला रोजगार प्रशिक्षण शिबिर संदर्भात रोजगार उद्योग शासनाच्या विविध नवीन योजना व महिला सक्षमीकरण तथा महिलांसाठी लघु उद्योग प्रशिक्षण जेनेकरुन घरबसल्या महिलांना रोजगार उपलब्ध होईल या संदर्भात सिरसाने तालुका चांदवड येथे महिला आघाडी चांदवड तालुका अध्यक्ष सौ.भाग्यश्री केदारे यांनी कार्यक्रम आयोजित केला होता.
या वेळी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम पाठिशी उभे राहून धाऊन जाणारे महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष शेतकरी नेते संपत बाबा वक्ते महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष श्रीमती वैशालीताई सोनवणे मनसे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र विसपुते अनंत सांगळे श्रीमती योगीता सिरसागर रोहिणी घागरे लता खैरनार व स्थानिक महाराष्ट्र सैनिक व महिला आघाडी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोठ्या प्रमाणात महिलांनी प्रतिसाद दिला तसेच सिमा स्किल सेंटरच्या संचालीका सौ रेखाताई गांगुर्डे सिमाताई वानखेडे यांनी महिलांना महिला रोजगार स्वयंरोजगार प्रशिक्षण सक्षमीकरण संदर्भात योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले