वरुड येथे युवा शेतकर्‍याची गळ्याला फास घेऊन आत्महत्या..

 वरुड येथे युवा शेतकर्‍याची गळ्याला फास घेऊन आत्महत्या..


अकोला बाजार दि.०१ (प्रतिनिधी प्रवीण राठोड)वडगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वरूड या गावातील तरुण शेतकऱ्याने केली आत्महत्या. संततधार पाऊस व अतिवृष्टी मध्ये पीक खरडून गेले, त्यामुळे उसनवारी व शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विचारात असलेल्या एक तरुण शेतकर्‍यांने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

 महादेव सुखदेव थाटे वय 33 वर्ष रा. वरूड. महादेव थाटे यांच्याकडे अडीच एकर कोरडवाहू जमीन आहे. त्यात त्यांनी या वर्षी व्याजाने पैसे काढून शेतीची मशागत करून पेरणी केली. परंतु या वर्षी मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकर्‍याला दुबार पेरणी करावी लागली. दुबार पेरणी करून कसे बसे पीक डोलायला लागले असताना गेल्या महिनाभरापासून संततधार व अतिवृष्टी झाल्याने हाती येणारे पीक पूर्ण खरडून गेले. आपण आता पुन्हा कर्ज बाजरी होऊ, लोकांकडून घेतलेले पैसे कसे फेडायचे या विचारात असलेल्या महादेव थाटे याने  मध्यरात्री घराजवळील गोठ्यात गळफास लावून आपली जिवनयात्रा संपविली. सदर घटनेची माहिती वरूड चे पोलिस पाटील तुरळणकर यांनी वडगाव पोलिस स्टेशन ला दिली असता जमादार कावळे, जमादार राठोड, यांनी घटना स्थळी येऊन पंचनामा केला व शव उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाठविले, मृतक महादेव थाटे हा घरातील मुख्य कर्ता पुरुष असल्याने थाटे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, मृतकाच्या पश्चात पत्नी मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने