कोळंबी नजिक दुचाकी झाडावर आदळून एकाचा जागीच मृत्यू.
अकोला बाजार,दि.०१ (प्रतिनिधी प्रवीण राठोड):अकोला बाजार ते यवतमाळ या मार्गावर असलेल्या कोळंबीच्या जंगलात सागवान च्या झाडावर दुचाकी आदळल्याने दुचाकीस्वार हा जागीच मृत्यू पावला.सदर घटना दिनांक 30 ऑगस्ट च्या रात्री 7-8 दरम्यान घडली असून अभिषेक मनोहर माळे वय 25 वर्ष रा. खैरगाव असे दुचाकीस्वाराचे नाव असून अभिषेक हा यवतमाळ येथे पेट्रोल पंप वर काम करून आपला घराचांचा उदरनिर्वाह करीत होता. परंतु काळाच्या नियतीला हे मान्य नव्हते रोजच्या नुसार अभिषेक हा MH29 BN 3126 या क्रमांकांच्या दुचाकीने आपले काम आटोपून गावाकडे परत येत असताना कोळंबीच्या जंगलात भरधाव दुचाकी ही सागवान झाडावर आदळली. तेवढ्यात येणार्या जाणार्या काही वाटसरूंनी ambulance ला बोलावून अभिषेकला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अभिषेकच्या मागे आई व एक भाऊ असा आप्त परिवार आहे.