रावेर भागात केळी पिकावर हरण्या रोगाची लागण..वेळीच उपाययोजना करावी शेतकऱ्यांना आवाहन


रावेर भागात केळी पिकावर हरण्या रोगाची लागण
..वेळीच उपाययोजना करावी शेतकऱ्यांना आवाहन

रावेर दि.०२( प्रतिनिधी): जळगाव जिल्ह्यात केळी पिकावर विषाणूजन्य हरण्या रोगाने धूडगूस  घातला असून शेतकरी वर्ग कमालीचा अस्वस्थ झाला आहे.नुकत्याच कृषी विभागाच्या पाहणी अहवालातून ही बाब समोर आली आहे.तरी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता लक्षणें ओळखून ताबडतोब उपाय करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

केळी पट्ट्यात विषाणुजन्य रोगाने शिरकाव केला आहे आणि जिल्ह्यातील महत्वाचे पिक म्हणून  केळी पिकाकडे पाहिले जाते.रावेर तालुक्यातील काही गावात थोड्या प्रमाणात विषाणूजन्य रोगाची लागण झालेली दिसून येत आहे.

मौजे कुसुंबा येथे सी एम व्ही तसेच करपा केळी पिकावरील रोगाची पाहणी करण्यात आली सदर पाहणी करताना  कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ महेश महाजन सर तसेच अतुल पाटील सर व तालुका कृषी अधिकारी मयूर भामरे  व गावाचे कृषी सहाय्यक संदीप बारेला,सचिन गायकवाड कृ.सा.व प्रगतशील शेतकरी मदन पंडित , रामकृष्ण महाजन यांनी पाहणी केली.

  • कृषी विभागाचे आव्हान CMV रोगाचे लक्षणे  खालील प्रमाणे :
  • १) या रोगाला स्थानिक भाषेत 'हरण्या' रोग असे म्हणतात.
  • २) पानांमधील हरीतलवकाचा नाश झाल्यामुळे पानांवर पिवळे पट्टे (रेषा) पडतात.
  • ३) पोम्यावर प्रादुर्भाव झाल्यास पोंगा सडत्यासारखा किंवा जळाल्यासारखा दिसतो.
  • ४) कालांतराने रोगाचे प्रमाण वाढत जाऊन केळीचे रोप मरून जाते.
  • ५) हा शक्यतोवर लहान रोपांवर आढळून येतो.

*प्रभावी नियंत्रणासाठीच्या उपाय योजना :*

  • १) प्रादुर्भावग्रस्त झाडे मुळासकट उपटून दूर ठिकाणी जाळून किंवा गाडून टाकावी. बागेचे २-३ वेळा ४-५ दिवसांनी निरीक्षण करून रोगग्रस्त झाडे आढळल्यास त्यांचीही वरीलप्रमाणे विल्हेवाट लावावी.
  • २) बागेतील व बांधावरील सर्व प्रकारची तणे उपटून नष्ट करावीत व बाग तणविरहीत ठेवावी.
  • ३) बागेतील बिलाची भाजी काढून बाग स्वच्छ करावी.
  • ४) बागेमध्ये काकडीवर्गीय पिके तसेच टोमॅटो, बांगी व इतर भाजीपाला वर्गीय पिके घेऊ नये, ५) मावा, तुडतुडे, पांढरीमाशी या वाहक किडीच्या बंदोबस्तासाठी डोयमेथोएट (30E.C.) २०.मी.ली. किंवा थायमेथॉक्झाम 25 W.G. २ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रीड १७.८ S.L.५ मी.ली. या किटकनाशकांची १० ली.पाण्यामध्ये मिसळून बाग पूर्ण स्वच्छ करून फवारणी करावी. ६) क्लोरोपायरीफॉस ४५ मी.ली. निमार्क ५० मि.ली. स्टीकर २५ मी.ली. १५ लिटर पाण्यात मिसळून फवारावे किंवा .
  • ७) अॅसिटामीपीड ६ ग्रॅम निमार्क ५० मि.ली. स्टीकर २५ मी.ली. १५ लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
  • ८) गावपातळीवरील सर्व शेतकन्यांनी एकत्रितरित्या नियंत्रणासाठी स्वतंत्र मोहिम राबविणे अत्यंत आवश्यक आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने