स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव "अंतर्गत विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव "अंतर्गत विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण




*पाचोरा दि.०२ (प्रतिनिधी श्री राजेंद्र खैरनार ):कै. पि के शिंदे माध्यमिक विद्यालय  व  पंचायत समिती पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव "अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण विद्यालयाच्या प्रांगणात नुकतेच करण्यात आले. प्रसंगी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री नरेंद्र चौधरी साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी अण्णा सो श्री समाधान पाटील साहेब, भातखंडे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री अभिषेक खैरणार साहेब यांच्यासह गिरनाई शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय तात्यासाहेब पंडितराव शिंदे संचालक नीरज भाऊ मुनोत, प्राध्यापक शिवाजी शिंदे सर त्याचप्रमाणे मुख्याध्यापक एस व्ही गीते सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षा व विद्यालयातील उपशिक्षिका सुषमा पाटील मॅडम यांची कन्या मानसी पाटील या  विद्यार्थ्यांचा सत्कार ट्रॉफी व बक्षिसे देऊन करण्यात आला. समायोजित भाषणांमध्ये मान्यवरांनी शाळेचा आणि विद्यार्थ्यांचा गौरव व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत टोणपे तर आभार डीआर कोतकर यांनी व्यक्त केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने