"रौप्यमहोत्सवी वर्षांचा कलात्मक प्रवास प्रेरणादायी"..निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांचे प्रतिपादन


 "रौप्यमहोत्सवी वर्षांचा कलात्मक प्रवास प्रेरणादायी"..निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांचे प्रतिपादन

  •  स्पंदन हस्तलिखित भित्तिपत्रकाचे उद्घाटन


चोपडा,दि.०२(प्रतिनिधी)-  येथील भगिनी मंडळ संचालित ललित कला केंद्र या कलासंस्थेत *"स्वातंत्र्याची ७५वर्षे:काय कमावले, काय गमावले?"* या स्पंदन हस्तलिखित भित्तिपत्रकाचे रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ६१व्या विशेषांकाचे *जळगावचे निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील* यांच्या शुभहस्ते उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.

याप्रसंगी विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  संभाजीराव ठाकूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या भित्तिपत्रकात ९८वर्षीय स्वातंत्र्यसैनिक मोहनलाल छोटालाल गुजराथी,प्रा.अरुणभाई गुजराथी,जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी(जळगाव), शेतीतज्ञ भागवत विश्वनाथ पाटील (निंबोल),कवी अशोक निळकंठ सोनवणे,हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्राचार्य डॉ.सुभाष महाले(जळगाव), स्त्रीनेत्या इंदिराताई पाटील, विजयाताई पाटील,मुख्याध्यापक बी.एन.चौधरी (धरणगाव), कवी अशोक कोतवाल, चित्रकार राजू बाविस्कर, डॉ.विकास हरताळकर, सुधाकर केंगे, प्रताप विद्यालयाच्या सचिव माधुरी मयूर, चित्रकार पिसुर्वो(मुंबई) इ.मान्यवरांची चिंतनशील मते  कलात्मक पद्धतीने मांडलेली आहेत.या शुभप्रसंगी उद्योजक आशिष गुजराथी,भगिनी मंडळाच्या अध्यक्षा पूनम गुजराथी, सहसचिव अश्विनी गुजराथी,गझलकार योगिता पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय धनगर, उपप्राचार्य डॉ.आशिष गुजराथी,कवी बाळकृष्ण सोनवणे, अभियंता व्ही.एस.पाटील इ.मान्यवर उपस्थित होते.

या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून प्रा.विनोद पाटील तर संकल्पना,सजावट व अक्षरलेखन नम्रता अग्रवाल,कांचन कोळी,शिवम सैदाणे,देवेश बाविस्कर,अदिती जोशी,धनश्री पाटील, सिद्धार्थ ढिवरे,मयूर राजपूत,माधुरी पाटील,नम्रता सावकारे,कोमल लोहार,भूपेंद्र महाजन,आकाश पावरा,इसाक पावरा या विद्यार्थ्यांनी केले.फलकलेखनरेखन प्रा.सुनिल बारी तर सुत्रसंचालन प्रा.संजय नेवे यांनी केले.तर आभार प्रदर्शन प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भगवान बारी,अतुल अडावदकर, प्रवीण मानकरी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने