फ.म. ललवाणी हायस्कूल बेटावद 42 वेे तालुका विज्ञान प्रदर्शन संपन्न

 *फ.म. ललवाणी हायस्कूल बेटावद 42 वेे तालुका विज्ञान प्रदर्शन संपन्न*  

   बेटावद दि.०२(प्रतिनिधी): येथील जनता विद्या प्रसारक संस्था संचलित फ म ललवाणी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बेटावद  येथे तालुका विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले                                     आज विज्ञानामुळे भारत जगाच्या पाठीवर महाशक्ती निर्माण करण्यासाठी प्रगतीपथावर आहे गणित व विज्ञान या विषयांना शिक्षणाचे वाघिणीचे दूध संबोधले जाते त्याशिवाय आपण जगू शकत नाही व विद्यार्थ्यांनी मला काय बनायचे आहे हे ध्येय निश्चित ठेवली पाहिजेत असे प्रतिपादन माजी मंत्री  व विध्यमान आमदार श्री  जयकुमार रावल यांनी 42 व्या  तालुका विज्ञान प्रदर्शना चे  उदघाटन करतांना केले        

 कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक गुजर होते कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर पंचायत समिती शिंदखेडा सभापती सौ अनिता पवार जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष गटनेते कामराज निकम जिल्हा परिषद सदस्य  श्री पंकज कदम वर्षीचे गटाचे जी प सदस्य श्री डी आर पाटील कृषी भूषण श्री प्रकाश पाटील कपिलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष श्री  सिद्धार्थ पवार  पंचायत समिती उपसभापती श्री राजेश पाटील बेटावद गावाचे सरपंच श्रीमती सुशिलाबाई कोळी पंचायत समितीचे सदस्य श्रीमती नंदिनी कोळी विज्ञान अध्यापक मंडळाचे कार्याध्यक्ष  श्री संजय पवार शिंदखेडा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डॉ सी के पाटील विस्ताराधिकारी श्री डी एस सोनवणे श्री सी जी बोरसे श्रीमती शैलेजा शिंदे केंद्रप्रमुख श्री जगदीश पाटील श्री सी एस खर्डे श्री बी बी भिल तालुका विज्ञान गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष रवींद्र चित्ते  सचिव श्री एस एन माळी उपाध्यक्ष श्री अतुल पाटील मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष  एस के कदम सचिव श्री एम डी पाटील जिल्हा उपाध्यक्ष श्री कैलास बाविस्कर फ म ललवाणी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य  श्री वाय डी चाचरे जिल्हा विज्ञान उपक्रम समितीचे अध्यक्ष संजय गोसावी उपाध्यक्ष श्री एस एन पाटील कार्याध्यक्ष जे डी भदाणे सदस्य श्री राजेंद्र खैरनार श्री एन पी भिलाने श्री आर बी मोरे श्री नितिन पाटील केंद्रप्रमुख श्री पी पी सांगळे तालुका विज्ञान संघाचे सचिव श्री एस एन माळी आदी मान्यवर उपस्थित होते .                 तज्ञ परीक्षक म्हणून प्राथमिक गटात श्री ए एस माळी श्री एम एम चौधरी श्री पी व्ही माळी माध्यमिक गटात श्री बी पी देवरे श्री  एच डी बच्छाव श्री वाय आर देसले यांनी केलं                                तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात एकूण प्राथमिक गटात 41 व माध्यमिक गटात 61 विद्यार्थ्यांनी उपकारणासह सहभाग नोंदवला शिक्षक गटातून एकूण 7 तर 3 प्रयोग परिचाराकांनी सहभाग नोंदवला                          विज्ञान प्रदर्शन यशस्वीतेसाठी  फ मु ललवाणी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  यांनी परिश्रम घेतले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने