*चोपडा कनिष्ठ महाविद्यालयात पोस्टर सादरीकरण स्पर्धा संपन्न
चोपडा,दि.०२(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील *इंग्रजी भाषा अभ्यास मंडळातर्फे *इंग्रजी साहित्य व व्याकरणावर आधारित पोस्टर सादरीकरण स्पर्धेचे आयोजन महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेच्या सचिव डाॕ स्मिता संदीप पाटील , महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ डी ए सूर्यवंशी , विरवाडे येथील विद्याभारती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एल एच पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याच्या माजी शिक्षणमंत्री कै. आक्कासाहेब शरश्र्चंद्रिका सुरेश पाटील व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कै.डॉ. सुरेश जी.पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले व त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.अध्यक्षीय मनोगतात अॕड संदीप पाटील म्हणाले की प्रत्येकाने आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त इंग्लिश पुस्तके वाचण्याची आवश्यकता आहे जेणकरून या वाचनाद्वारे इंग्लिश विषयाबाबत आपल्या मनात आवड निर्माण होईल. यावेळी त्यांनी विविध इंग्लिश कादंबऱ्यांची व कथांची नावे सांगून सदर इंग्लिश साहित्य ग्रंथालयात जाऊन वाचण्याचे व त्यातील ज्ञान आत्मसात करण्याचे तसेच इंग्रजी वर्तमानपत्रे वाचण्याचे आवाहन उपस्थितांना केले. प्राचार्य डाॕ डी ए सूर्यवशी यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेची गोडी लागण्यासाठी व स्पर्धेच्या युगात चांगल्या करिअरची संधी मिळण्यासाठी अशा स्पर्धा अत्यावश्यक असल्याचे सांगितले . एकुण 125 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेत अनुक्रमे प्रथम, द्वितीय , तृतीय व उत्तेजनार्थ बक्षीस मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीसे देण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा बी एस हळपे यांनी केले. परीक्षक म्हणून प्रा. दिलीप पंडित सपकाळे व राजेंद्र माध्यमिक विद्यालय, गोरगावले येथील शिक्षक श्री. भटु भाईदास कोळी यांनी काम पाहिले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 12 वी कला शाखेच्या विद्यार्थीनी कु.मानसी निकम व कु.निकिता पारधी तसेच आभार व कार्यक्रमाचे आयोजन प्रा विवेकानंद शिंदे यांनी केले.
याप्रसंगी पर्यवेक्षक प्रा एस पी पाटील, समन्वयक प्रा.ए एन बोरसे , प्रा एस टी शिंदे, प्रा ए पी लांडगे प्रा दिनानाथ पाटील प्रा प्रमोद पाटील आदि उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. दिपाली पाटील,प्रा.विशाल पाटील, प्रा अभिजित पाटील,प्रा.दिपक करणकाळ,प्रा निवृत्ती पाटील,प्रा जयेश पाटील, प्रा सौरभ जैन,प्रा.संदीप देवरे, श्री निलेश सोनवणे श्री राकेश काविरे व श्री धीरज बावीस्कर यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.
