जागतीक हृदयरोगाच्या दिवशीच ५२ वर्षीय इसमाचा हृदय विकाराच्या झटक्याने निधन
चोपडा दि.२९(प्रतिनिधी)आज उप जिल्हा रुग्णालय चोपडा येथे मजरे हिंगोना येथील विकास विनायक पाटील उर्फ भाऊसाहेब वय वर्षे ५२ हे इसम गेल्या दोन दिवस छातीत दुखत असल्याचे सांगून जनसेवा हॉस्पीटल मध्ये उपचार घेत होते, परंतु ते आज चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालया मधून पुन्हा तपासणी करून घ्यावी म्हणुन केस पेपर काढण्यासाठी जाता जाताच रुग्णालयात त्यांना चक्कर येऊन खाली पडले, रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.मनोज पाटिल व डॉ.गुरुप्रसाद वाघ यांनी रुग्णाला अती तात्काळ वर्डात/ ICU मधे युद्धपातळीवर उपचार सुरू केले, शर्तीचे प्रयत्न असफल झाले, कारण हृदयाला झटका इतका तीव्र होता की, उपचाादरम्यानच भाऊसाहेब यांची ज्योत मालवली.मजरे हींगोना गावावर शोककळा पसरली आहे.मयत विकास उर्फ भाऊसाहेब यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी,भाऊ असे कुटुंब आहे.