चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना संचालकांनी बैठकीकडे फिरविली पाठ ..

 चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना संचालकांनी  बैठकीकडे  फिरविली पाठ ..

चोपडा दि.२९(प्रतिनिधी): चोपडा साखर कारखाना   संचालक मंडळाची  २९ सप्टेंबर रोजीच्या आयोजित सभेकडे संचालक मंडळाने पाठ फिरवल्याने तहकूब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.आजच्या बैठकीत काही महत्वपूर्ण मुद्यावर परखड  चर्चा होण्याचे प्रार्थमिक संकेत मिळाल्याने गाशा गुंडाळण्यात आल्याची जोरदार चर्चा सभासदांमध्ये आहे.कारखान्यात लाखोंचे भंगार गायब झाल्याचे वादळं उठल्यानंतर चौकशी सुरू असल्याने काहींची धकधक वाढल्याने सभा  वादळी होण्याची  शक्यता सभासदांनी व्यक्ती केली होती.

 कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक यांच्या सहीने दि.२२सप्टेंबर रोजी संचालकांसाठी सभेचा अजेंडा निघाला होता. ती सभा आज दि २९ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली होती तशी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 30 सप्टेंबर च्या आत  घेणे हे बंधनकारक असते त्या अनुषंगाने ही सभा ठेवण्यात आली होती .  मात्र कारखान्यात अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप तथा तक्रारी काही संचालकांनी केल्याने   चौकशीचे  गुऱ्हाळ सुरू झाले आहे   या सर्व हालचाली पाहता बैठकीकडे बऱ्याचशा  सभासदांनी  पाठ फिरवल्याने सभा तहकूब झाल्याची माहिती समोर आली आहे ‌   संचालकांच्या मासिक मीटिंगमध्ये खर्चाचा गोषवारा देण्यास चेअरमन टाळाटाळ करीत आहेत त्यामुळे संचालकांमध्ये अस्वस्थता व नाराजी असल्यामुळे आज रोजी झालेल्या मासिक मीटिंगमध्ये संचालकांनी चेअरमन यांच्यावर अविश्वास दर्शवित मीटिंग कडे पाठ फिरवली असल्याचे काही सभासदांकडून बोलले जात आहे .

या बैठकी संदर्भात अधिकृत माहितीसाठी चेअरमन अतुल ठाकरे यांच्याशी  भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता  प्रतिसाद मिळाला नाही तसेच एमडी. पिंजारी  यांच्याशी संपर्क झाला असता त्यांनी मी बाहेर गावी असून चेअरमन यांच्याकडे माहिती मिळेल असे सांगितल्याने  त्यामुळे  अधिक माहिती प्राप्त होऊ शकली नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने