नाशिकच्या स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. वर्षा लहाडे यांच्या देखरेखीखाली चोपडा तालुक्यातील ५५ कुटुंब कल्याण बिनटाका शस्त्रक्रिया यशस्वी
चोपडा दि.२९(प्रतिनिधी) आज चोपडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वैजापूर च्या 37 ,लासुर 15 ,उपजिल्हारुग्णालय 2 याप्रकारे एकूण 55 दुर्बिणीतून बिनटाका कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे पार पडले. विशेष म्हणजे नाशिक येथील डॉ. डॉ वर्षा लहाडे मॅडम ह्यांच्या देखरेखीखाली जळगाव चोपडा येथील डॉक्टरांचा चमू उपस्थित होता.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किरण पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर तुषार देशमुख,माता बाळ संगोपन अधिकारी डॉक्टर मनीषा बांगर ,मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मनोज पाटील उपजिल्हारुग्णालय,तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रदीप लासुरकर,सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी ,चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील सर्व वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी ,स्त्री रोग तज्ञा, डॉक्टर पवन पाटील डॉक्टर गुरुप्रसाद वाघ डॉक्टर चंद्रहास पाटील भुल रोग तज्ञ डॉक्टर नरेंद्र पाटील ,यांच्या उपस्थितीत नाशिक येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञा डॉ वर्षा लहाडे मॅडम यांनी सर्व 55 शस्त्रस्क्रिया माता सुरक्षित ठेवून सफल पार पाडल्या ,सर्व चोपडा तालुक्यातील आरोग्य विभागातील सर्व आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी ,आशा सेविका सर्व परिचर , विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहकार्य केले ,माननीय डॉ वर्षा लहाडे मॅडम यांचे आभार तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर ,डॉ मनोज पाटील सर आणि सर्व वैद्यकीय अधिकारी आरोग्य विभाग चोपडा यांनी मानले