*चोपडा कस्तुरबा शाळेच्या शिक्षकांचा दूर्दैवी मृत्यू
चोपडा दि.०४(प्रतिनिधी) : येथील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक विकास पंडितराव कोष्टी यांचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दूर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत.ग.स.सोसायटीच्या मिटींगला गेले असतांनाच जळगावात चक्कर आल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता मयत झाल्याचे डॉक्टरांनी मयत घोषित करताच अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागल्याने दुःखा ची छाया पसरली.सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर चोपडा वैकुंठधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
चोपडा येथील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक विकास शिळवणे कोष्टी यांचे रेडक्रॉस सोसायटी जवळ चक्कर येऊन कोसळल्याने अकस्मात मृत्यू झाल्याची घटना रविवार दि. ४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत त्यांच्या नातेवाईकांना हि घटना एकूण धक्का बसला असून शिक्षक वर्गाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी गर्दी केली आहे. विकास शिळवणे कोष्टी हे आज जळगावत नूतन मराठा महाविद्यालयात आयोजित ग. स. च्या वार्षिक सभेत आले होते. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता सीएमओ डॉ. यासीर खान यांनी त्यांना मयत घोषित केले.त्यांच्या अचानक जाण्याने शिक्षक वर्गात शोककळा पसरली आहे.. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.
