जिवनाशी झुंझणाऱ्या बाबांचा अखेर मृत्यू.. रेल्वेच्या धक्क्याने झाले होते घायाळ

 जिवनाशी झुंझणाऱ्या  बाबांचा अखेर मृत्यू.. रेल्वेच्या धक्क्याने झाले होते घायाळ



जळगाव दि.०४(प्रतिनिधी)    धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जखमी झालेल्या ६५ वर्षीय वयोवृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रकाश नारायण पाटील (वय-६५) रा. राधाकृष्ण नगर. जळगाव असे मृत वृध्दाचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, प्रकाश पाटील हे राधाकृष्ण नगरात आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास सुरत रेल्वे गेट क्रमांक १४८ जवळ रेल्वे रूळ क्रॉस करत असतांना बैरानी एक्सप्रेसचा त्यांचा जोरदार धक्का बसला. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, दुपारी ४ वाजता उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याघटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रविंद्र ठाकूर आणि किशोर पाटील करीत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने