मेडीकल दुकानदाराला खंडणी मागणाऱ्या संशयितांस पोलिसांनी केली अटक

 मेडीकल दुकानदाराला  खंडणी मागणाऱ्या संशयितांस पोलिसांनी केली अटक


जळगाव,दि.०४ (प्रतिनिधी प्रवीण कोळी )शिवाजी नगरातील गेंदालाल मिल परिसरात असलेल्या मेडीकल दुकानदाराला चॉपरचा धमकी देवून खंडणी मागणाऱ्या संशयित आरोपीला शहर पोलीसात अटक केली आहे.

 याबाबत शहर पोलीस ठाण्यात यापुर्वी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, बाळासाहेब लक्ष्मण पाटील रा. दादावाडी,जळगाव यांचे गेंदालाल मिल परिसरात रामकृष्ण मेडीकल नावाचे दुकान आहे.  बाळासाहेब पाटील हे दुकानावर असतांना अजीज खान बाबुखान पठाण (वय-३८) रा. गेंदालाल मिल, जळगाव हा आला. आणि तुला तुझे दुकान चालवायचे असेल तर मला ५ हजार रूपये खंडणी दर महिन्याला द्यावा लागेल, असे पाटील यांना म्हणला. मात्र, पाटील यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर अजीज खान याने कमरेला लावलेला चॉपर काउंटरवर ठेवून पैसे जर मला दिले नाही तर मी तुला धंदा करू देणार नाही, अशी धमकी देऊन त्याने पाटील यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली होती. नंतर दुकानाच्या गल्ल्यातून अजीज खान याने साडेआठ हजार रूपयांची रोकड जबरीने काढून घेतली होती. मारहाण झाल्यामुळे पाटील हे जखमी झाले होते. उपचारानंतर शहर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली होती. त्यानुसार अजीज खान याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि अरूण सोनार, दत्तात्रय पोटे, पोहेकॉ विजय निकुंभ, भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, पोन. प्रफुल्ल धांडे, पो.ना. राजकुमार चव्हाण, योगेश बोरसे, योगेश इंधाटे, पो.कॉ. रतन गिते यांनी संशयित आरोपी अजीज खान बाबुखान पठाण याला गेंदालाल मील परिसरातून रविवारी ४ सप्टेंबर रोजी अटक केली आहे. त्याच्यावर पुढील कारवाई सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने