निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण लवकर पुर्ण करा...!राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस उर्वेश साळुंखे यांची मागणी
चोपडा दि.०५(प्रतिनिधी): कित्येक वर्षापासून *निन्म तापी प्रकल्प,पाडळसरे (धरण) ता. अमळनेर जिल्हा. जळगाव* या प्रकल्पाचे काम अपूर्ण आहे. तरी या धरणावर शेतकरी पुत्र तथा जळगाव जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस उर्वेश साळुंखे यांनी दि. ४ रोजी धरणाची पाहणी केली. पाहणी करून असे आढळले कि धरणाचे काम खूप अपूर्ण आहे. हे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी *केंद्र सरकार व राज्य सरकार* यांना विनंती करत आहे. या प्रकल्पाला *परिपूर्ण निधी* देऊन हा *प्रकल्प पूर्ण करावा अशी विनंती केंद्र सरकार व राज्य सरकार यांना करत आहे. तथा जळगाव जिल्ह्यातील सर्व खासदार आमदार तथा पुढारी यांना विनंती करतो की सदरील प्रकल्पाकडे परिपूर्ण लक्ष द्यावे*.
हा प्रकल्प पूर्ण झाला की अमळनेर चोपडा, पारोळा ,धरणगाव, एरंडोल,इ. या तालुक्यांच्या जबरदस्त *सिंचनाचा फायदा शेतकरी राजाला होईल*. आणि कित्येक गावांना या धरणाचा फायदा होईल. तरी खास करून *केंद्र सरकारने जर लक्ष दिले.* तर हा प्रकल्प *लवकरच पूर्ण होईल* अशी अपेक्षा उर्वेश साळुंखे यांनी केली
