श्री काळभैरव जागृत देवस्थान रुंधाटी येथे नवरात्रोत्सव....
अमळनेर दि.28(प्रतिनिधी): महाराष्ट्रातील साती राणा देवाचे एकमेव मंदिर अंमळनेर तालुक्यातील रूंधाटी येथे वंशपरंपरा 500 वर्ष पासून चालत आलेल्या रूढी प्रमाणे व नित्यनियमाप्रमाणे पूजा अर्चना चालत असते.
भाविकांचे मनोकामना पूर्ण करणारा असे हे दैवत प्रसिद्ध आहेत धार पवार कुळाचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणारे पुरातन काळापासून हे देवस्थान प्रचलित दैवत आहे..
घटस्थापना दिवशी नियमांप्रमाणे वाजत गाजत पहिले माती आणली मग सुर्यपुत्री तापी नदीचे पाण्याने घट भरून मंदिरात आणले व अखंड नऊ दिवस ज्योत लावण्यात आली .
