पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे दंत चिकित्सा शिबिर संपन्न
चोपडा दि.28(प्रतिनिधी ):--पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल चोपडा येथे दोन दिवसीय दंतचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते.
शिबिरात शिशु गटापासून ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची दंतचिकित्सा तपासणी करण्यात आली. डॉ. उमेश सरवैय्या व डॉ. सारिका पाटील यांनी आपला बहुमूल्य वेळ विद्यार्थ्यांच्या दंत तपासणीसाठी दिला. डॉ. उमेश सरवैय्या यांनी विद्यार्थ्यांना वर्गात जाऊन दातांची काळजी कशाप्रकारे घ्यावी व निरोगी दातांसाठी कानमंत्र दिले. सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश राणे व प्राचार्य मिलिंद पाटील यांची उपस्थिती लाभली. पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संचालक पंकज बोरोले यांचे या शिबिरासाठी मार्गदर्शन लाभले. शिबिर यशस्वीतेसाठी किरण चौधरी व ममता चौधरी आदीनी परिश्रम घेतले...