पंकज प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला खीर पदार्थाच्या "आस्वाद"...

 पंकज प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला खीर पदार्थाच्या "आस्वाद"...


चोपडा,दि.२८ (प्रतिनिधी):-
-राज्यात शालेय पोषण आहार योजनेतील विद्यार्थ्यांना अतिरिक्त पोषणमूल्य मिळावे यासाठी शासनातर्फे खिचडी सह विविध पदार्थांचे वाटप करण्यात येते. चोपडा येथील पंकज प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना सर्वात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे खीर. हा खीर पदार्थ बनवण्यात आला होता. पहिली ते सातवीच्या सुमारे १२०० विद्यार्थ्यांना खीर वाटप करण्यात आली. विद्यालयातील शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या ताई व विद्यालयाच्या शिक्षिका यांनी मिळून विद्यार्थ्यांसाठी चविष्ट खीर बनवली होती. खीर खाण्यासाठी सर्वच विद्यार्थ्यांनी वाटी व चमचे सोबत आणले होते .नित्य नियमाच्या पदार्थापेक्षा आपल्या आवडीच्या पदार्थ आज मिळाल्याने विद्यार्थ्यांनी खीर पदार्थाच्या आनंदाने आस्वाद घेतला .विद्यार्थ्यांना विद्यालयामार्फत नेहमीचे गोड पदार्थ बनविले जातात पण यावेळी विद्यार्थ्यांच्या आवडता गोड पदार्थ बनवावा अशी कल्पना विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील यांना सुचली.

      खीर बनवणे व वितरणासाठी अनिताताई, कविताताई ,सौ गायत्री शिंदे, सौ जयश्री पाटील, सौ प्रियंका पाटील, ज्योती महाजन ,दिलीप बाविस्कर, रवी शार्दुल ,कैलास बोरसे ,प्रमोद पाटील ,संदीप पाटील, राकेश गोयर आदींनी परिश्रम घेतले...

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने