श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्या मंदिरात दांडीया कार्यक्रम उत्साहात साजरा
पाचोरा ( प्रतिनिधी राजेंद्र खैरनार): येथे कार्यसम्राट श्री. किशोर आप्पा पाटील यांचे पुत्र सुमित किशोर आप्पा पाटील यांच्या संकल्पनेतून व भाजपाचे तालुकाध्यक्ष श्री अमोल भाऊ शिंदे यांच्या संकल्पनेतून " गरबा उत्साह हा आनंदाने साजरा झाला आहे,,त्यातच संजुनाना वाघ यांच्या पि.टी.सी. संस्था संचलित पाचोरा येथील मुख्य इमारत म्हणजे च देशमुख वाडीतील श्री.सु.भा.पाटील येथे विद्यार्थी विद्यार्थ्यींनी, शिक्षकांचे गरबा, दांडीया कार्यक्रम उत्साहात अनोखा कार्यक्रमसाजरा करण्यात आला,या कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे पालकवर्ग म्हणजे मुलांच्या आई सहभागी झाले त्यातच मुस्लिम महिला भगिनींनी सुद्धा नवरात्रोत्सव मध्ये मोठ्या आनंदाने गरबा खेळतांना दिसल्या म्हणजेच हिंदु-मुस्लिम यांचे एकात्मतेचे दर्शन दिसले,खरच सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर यांचे मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षिका,वृंद मोठे सहकार्य लाभले,,खरच "शाळेतील हा गरबा कार्यक्रम हा आगवेगळा दिसत आहे व कौतुकास्पद आहे