चोपडा रोटरॅक्ट क्लब तर्फे ३०० जनावरांना लंपी लसीकरण

 चोपडा रोटरॅक्ट क्लब तर्फे  ३०० जनावरांना लंपी लसीकरण


चोपडा,दि.३० (प्रतिनिधी)*चोपडा रोटरॅक्ट क्लब तर्फे चहार्डी व परिसरातील  300 गुरांना मोफत लंपी स्किन लसीकरण मोलाचा हात देण्यात आला आहे.

  देशपातळीवर सध्या लम्पी चर्मरोगाने थैमान घातले आहे. खेड्यापाड्यातील अनेक पशुपालकांचे पशुधन विशेषतः गाई वासरू बैल आणि काही प्रमाणात म्हशी या रोगाला बळी पडताना दिसतात. देशातील १२ राज्यात जवळजवळ १६५ जिल्ह्यातील ११.२५ लाख गाई-म्हशींमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. साधारणपणे ५० हजार जनावरांचा मृत्यू झाला आहे.   कोरोनाच्या तडाख्यातून माणसे बाहेर येत असताना आता लम्पी चर्मरोगाने जनावरांवर घाला घातला आहे. या रोगाविरुद्धही संघटितपणेच लढावे लागेल म्हणून रोटरॅक्ट क्लब यांच्या सहकार्याने 300 गुरांना मोफत लंपी स्किन लसीकरण शिबीर डॉ.श्वेता पाटील, डॉ.सागर चौधरी व यश पाटील यांच्या मदतीने राबविण्यात आले. शिबिराला रोटरॅक्ट क्लब अध्यक्ष  प्रा.दिव्यांक सावंत, उपाध्यक्ष मयांक जैन, खजिनदार मयुरेश जैन व भरतसिंग राजपुरोहित,प्रणय टाटिया व गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने