महोत्सव म्हणजे आनंद होय -- अरुणभाई गुजराथी*आनंद सुपर शॉपी तर्फे भजी महोत्सवाला खवय्याचा उत्तम प्रतिसाद*

 *महोत्सव म्हणजे आनंद होय -- अरुणभाई गुजराथी*आनंद सुपर शॉपी तर्फे भजी महोत्सवाला खवय्याचा उत्तम प्रतिसाद


चोपडा दि.२१(प्रतिनिधी) -- महोत्सव म्हणजे आनंद होय आणि आज भजी महोत्सवाचे आयोजन देखील आनंद सुपर शॉपीने केले आहे .असे आनंद देण्याचे काम  विविध उपक्रमातून नेहमीच आनंद सुपर शॉपीने केले आहे.भजी महोत्सव काय असते? हे चोपडा वासीयांना माहीत नव्हते ते आनंद सुपर शॉपी ने दाखवून दिले. या कार्यक्रमाचे दि.18 आगस्ट रोजी सकाळी 9 वाजता उदघाटन माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या सह अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

आज पर्यंत आनंद सुपर शॉपीने सामाजिक दायित्व दाखवत ग्राहकांसाठी अनेक नवनवीन ऑफर तसेच अनेक सामाजिक कामात भाग घेतले आहे. त्यांच् अनुषंगाने ग्राहकांना व शहरातील सर्व राजकीय मंडळी एका ठिकाणी एकत्र येऊन  सर्व मतभेद विसरून आपण गावाचा विकासासाठी कसे एक आहोत. असा संदेश जिल्हाभर जावा या उद्देशाने या  भजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भजी महोत्सवात सर्वच पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकारीनी व अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती. भाजीचा स्वाद घेत गावाचा विकासासोबतच राजकीय गप्पाही चांगल्याच रंगल्या होत्या. यावेळी चोसाकाचे माजी चेअरमन ऍड. घनश्याम अण्णा पाटील, पिपल्स बॅंकचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, व्हाईस चेअरमन प्रविणभाई गुजराथी, संचालक नेमीचंद जैन, दगडूशेठ अग्रवाल,चोसाका चेअरमन अतुल ठाकरे, मनसेचे नेते अनिल वानखेडे, ऍड.धर्मेंद्र सोनार, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन महेंद्र सोनार, कृउबाचे उपसभापती नंदकिशोर पाटील, संचालक धनंजय पाटील, शहर पोलिस स्टेशनचे पीएसआय श्री तांबे, रोटरी चे अध्यक्ष ऍड.रूपेश पाटील, प्रवीण मिस्तरी,एम.डब्ल्यू पाटील, व्हि. एस.पाटील, आशिष गुजराथी, प्रसन्न गुजराथी, डीवायएसपी श्री.रावले, दिपक भानुदास पाटील, कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदिप पाटील, भाजपाचे जगन्नाथ बाविस्कर, शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष एस.बी.पाटील, डॉ. राजेंद्र भाटिया, दिनेश गुजराथी, डॉ. पराग पाटील, एल.आय.सी.चे विकास अधिकारी प्रकाश पाटील,संजीव बाविस्कर श्रीमती उषा संचेती, सौ.सपना टाटिया,सौ.प्रियंका टाटिया,सौ.क्षमा टाटिया,भारतीय जैन संघटना अध्यक्ष निर्मल बोरा, गौरव कोचर यांच्यासह शेकडो लोकांनी हजेरी लावली. भजी महोत्सवाचा प्रतिसाद पाहता आयोजकांना सकाळ पासून तर रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवावे लागले. आयोजक डॉ. निर्मलकुमार टाटीया, मनिष टाटीया,चेतन टाटीया यांनी आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने