व्ही. के. पाटिल इंटरनॅशनल स्कूल , शिंदखेडा येथे दहीहंडी उत्साहात संपन्न....!
शिंदखेडा दि.२१(प्रतिनिधी): व्ही. के . पाटील इंटरनॅशनल स्कूल, शिंदखेडा येथे दि.१९ आॅगस्ट २०२२ रोजी ' श्रीकृष्ण जन्माष्टमी ' निमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला याप्रसंगी विद्यालयाच्या अध्यक्षा मा.मिनाताई पाटील प्रमुख अतिथी तसेच विद्यालयाचे प्राचार्य मा. लाईश्राम धनंजाॅय सिंह व समन्वयक भगवानसिंह राजपूत उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले विद्यालयातील इयत्ता पहिली ते चौथीच्या लहान लहान चिमूरड्यांनी राधा कृष्ण यांची वेशभूषा केली होती. कार्यक्रमांतर्गत दहीहंडी फोडण्यासाठी शाळेच्या भगतसिंग हाऊस , चंद्रशेखर आजाद हाऊस , सुभाष चंद्र बोस हाऊस व लोकमान्य टिळक हाऊसच्या गोविंदा पथकांनी सहभाग घेतला यावेळी संगीताच्या , कृष्ण गीतांच्या व ढोल ताशाच्या तालावर गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडण्यासाठी मनोरे रचले यामध्ये सुभाष चंद्र बोस या गोविंदा पथकाने कमी वेळ घेऊन दहीहंडी फोडण्यात यश मिळविले करिता त्यांना प्रथम क्रमांकाचे मानकरी जाहीर करण्यात आले. इतर गोविंदा पथकांनीही दहीहंडीपर्यंत पोहोचण्यासाठी सुंदर मनोरे रचून दहीहंडी फोडून यशस्वी सलामी दिली. मुलींच्या गोविंदा पथकाने सुद्धा सहभाग नोंदवून दहीहंडी फोडण्यात यश मिळविले . यावेळी परीक्षक म्हणून विद्यालयातील मनोज पाटील सर मधुकर माळी सर होते. कार्यक्रम स्थळी हाथी घोडा पालकी , जय कन्हैयालाल की , गोविंद बोलो , हरी गोपाल बोलो , गोविंदा आला रे , आला अशा घोषणांनी संपूर्ण वातावरण गोकुलमय झाले होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक - शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
व्ही. के. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये दरवर्षी अशा स्वरूपाचे विविध सण उत्सवांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते याद्वारा विद्यार्थ्यांना सांस्कृतिक जाणीवांचे संस्कार रुजवले जातात
