अण्णाभाऊ साठे यांचे कार्य सर्व समाजाभिमुख होते : जयसिंग वाघ

 


अण्णाभाऊ साठे यांचे कार्य सर्व समाजाभिमुख होते : जयसिंग वाघ

------------------------------------

जळगाव दि.०१(प्रतिनिधी):    लोकशाहीर तथा कामगार नेते अण्णाभाऊ साठे यांची आपली चळवळ व विचारधारा सर्व समाजाच्या उन्नतीसाठी  होती मात्र त्यांच्या एकूणच कार्याला महाराष्ट्र सरकारने दडपण्याचा प्रयत्न केला, तरीसुध्दा त्यांची लेखणी चौदा देशांमध्ये गेली , त्यांच्या अनुयायांनी सुद्धा त्यांना पूर्ण साथ दिली नाही नाहीतर ते राष्ट्रीय पातळीवर पोहचले असते असे स्पष्ट प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले 

     अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात वाघ बोलत होते , सुरवातीला जयसिंग वाघ , प्रा  मोहन चव्हाण ( एरोनडल ) , प्रा अशोक पारधे , मातंग समाज जिल्हाध्यक्ष राजेंद्र बोदोडे यांनी अण्णाभाऊ यांच्या पुतळ्यास हार अर्पण केले , दीप प्रज्वलित करून अभिवादन केले

जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितलेकी आजच्या तरुण पिढीने अण्णाभाऊंचे साहित्य , त्यांचे कार्य , संघर्ष नव्याने जनमानसात नेले तर महाराष्ट्र राज्यात नवी क्रांती होऊ शकते .

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा मोहन चव्हाण , प्रास्ताविक प्रा अशोक पारधे तर आभार प्रदर्शन राजेंद्र बोदोडे यांनी केले

या प्रसंगी संजय अंभोरे , प्रदीप बाविस्कर , सागर बोदोडे , अनिकेत अंभोरे , युवराज अंभोरे , रामभाऊ मोरे , रविंद्र बाविस्कर ,सामाजिक कार्यकर्ते सुरेश अंभोरे ,

 नामदेव मोरे , रामा चांदनशिव , दीपक बोदोडे , दिनेश बोदोडे आदींसह लोक मोठ्या संख्येने हजर होती 

 या प्रसंगी वाजंत्री वाजवून , जयघोषाच्या घोषणा देऊन  अण्णाभाऊ यांना अभिवादन करण्यात आले , पोलीस बांधव मोठ्या संख्येने हजर होती .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने