चोपडा प्राथमिक कन्या विद्या मंदिरात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती
चोपडा दि.०१(प्रतिनिधी) सद्गुरू रुशिक्षण मंडळ संचलित प्राथमिक कन्या विद्या मंदिर चोपडा या ठिकाणी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती च्या कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलेले होते. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी भाषणात सहभाग घेतला .सदर स्पर्धेत मानसी येसे, गुंजन , पाटील हर्षदा पाटील या विद्यार्थिनींना अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायक चौधरी , प्रमोद पाटील व मुख्यध्यापक गोपाल पाटील यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमला शाहिद बागवान , ईश्वर पाटील उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता पाटील तर आभार प्रदर्शन श्यामसुंदर पाटील यांनी केले.