*पंकज इंग्लिश मिडीयम स्कूल येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी*
चोपडादि.०२ (प्रतिनिधी,) :--- दि. 1 ऑगस्ट रोजी पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था, चोपडा. संचलित पंकज इंग्लिश मिडियम स्कूल येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपले मनोगत व्यक्त केले. सकाळच्या सत्रात सौ. रवीना भादले यांनी व दुपारच्या सत्रात किशोर अर्जुन पाचवणे यांनी माहिती दिली व सौ. अनिता पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सकाळ व दुपारच्या सत्रात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केलेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य गणेश साळुंखे उपस्थित होते. त्यानंतर शाळेकडून उत्कृष्ट भाषण देणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले...