आडगावला कृष्णजन्माष्टमी साजरी*

 *आडगावला कृष्णजन्माष्टमी साजरी* 



चोपडा  दि.२१ (प्रतिनिधी) - तालुक्यातील आडगाव येथे भगवान श्रीकृष्ण जयंती तारीख 19 रोजी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास भक्ती भावाने उत्साहात व आनंदात साजरी  करण्यात आली . 

श्रीराम मंदिरात भजनी मंडळाने भजन, गौळणी गाऊन पाळणा सजविण्यात आला नवल सुखदेव पाटील यांच्या निवासस्थानी शिवाजीनगर भागात हरिविजय ग्रंथाचा तिसरा कृष्ण जन्माचा अध्याय कवी तथा ज्येष्ठ पत्रकार रमेश जे पाटील यांनी वाचन केला. यावेळी नवल पाटील , पुंडलिक पाटील , सौ मीराबाई पाटील , कोकिळाबाई  पाटील , श्रीमती राधाबाई पाटील , सौ सुशिलाबाई पाटील , श्रीमती जनाबाई पाटील , सुमनबाई  माळी , श्रीमती शांताबाई पाटील यांनी गाणे गाऊन जन्माष्टमी सोहळ्यात  भाग घेतला .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने