सुदिप बहुउद्देशिय संस्थांतर्फे अंबाडे जि.प.प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप
चोपडा दि.२१(प्रतिनिधी): सुदिप बहुउद्देशिय संस्था, चोपडा जि. जळगांव* यांच्या मार्फत आज दिनांक 18 ऑगस्ट 2022 गुरुवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंबाडे ता. चोपडा जि. जळगांव येथे भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमिवर शालेय विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भारताच्या प्रथम महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा पूजन करून करण्यात आली.यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलतांना बडगुजर सरांनी शैक्षणिक साहित्याचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग होईल यावर मुलांना सविस्तर मार्गदर्शन केले. मुलांना शिक्षणाची आवड निर्माण होईल. सामाजिक संस्थांनी मदत केल्यामुळे विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी होईल. विद्यार्थ्यांना शाळेविषयी ओढ निर्माण होईल. स्वयंसेवी संस्थाचे समाजकार्यत असलेले योगदान किती महत्वाचे आहे हे सांगितले. मुलांना साहित्य मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद वखाण्यासारखा होता. कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा मा. श्रीमती सुजाता बाविस्कर, प्रमुख पाहुणे मा. श्री. सुरेश साळुंके (सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती), कार्यकामाचे अध्यक्ष मा. श्री. सुनील बडगुजर (मुख्याध्यापक, जि. प. प्राथ. शाळा अंबाडे), कार्यक्रमाचे सूत्र संचालन मा. श्री आकाश बोरसे(उपशिक्षक, जि. प. प्राथ. शाळा, अंबाडे) साहित्य घेण्यासाठी आर्थिक मदत करणाऱ्या डॉ. संबोधी देशपांडे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. मा. सौ. प्रतीक्षा पाटील ( उपशिक्षिका, जि. प. प्राथ. शाळा, अंबाडे) यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी सहकार्य केले व कार्यकामाचा समारोप मा. श्री. संदीप पाटील ( उपशिक्षक, जि. प. प्राथ. शाळा, अंबाडे) यांनी केला.
