श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे बाल दहीहंडी"चा कार्यक्रम उत्साहात संपन्न.....!

  श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर  येथे बाल दहीहंडी"चा कार्यक्रम उत्साहात संपन्न..









*पाचोरा,दि.२१  (प्रतिनिधी  राजेंद्र खैरनार)पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे आज श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने *बाल दहीहंडीचा* कार्यक्रम घेण्यात आला. बालगोपाळांचे दोन थर लावत सलामी देण्यात आली .शाळेचे मुख्याध्यापक श्री. अशोक परदेशी सर  यांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करण्यात आले. बालगोपालाने मोठया जल्लोषाने दहीहंडी फोडूली याप्रसंगी मुलांची व मुलींची अश्या दोन दहीहंडी बांधण्यात आल्या होत्या  तसेच  विद्यार्थ्यांनी  राधा  व कृष्ण यांच्या वेशभूषा करून गरबा-दांडिया ,ढोल-ताशांच्या गजरात नृत्य केले. मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित राहून दहीहंडीचा आनंद घेतला. त्याचबरोबर बालगोपाळांना कृष्ण जन्माष्टमी चा प्रसाद वाटप करण्यात आला. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने