*जागतिक फोटोग्राफी दिन चोपड्यात उत्साहात साजरा*
चोपडादि.२१ (प्रतिनिधी) फोटोग्राफर असोसिएशन द्वारा आयोजित जागतिक फोटोग्राफी दिन (तारीख १९ऑगस्ट ) शहरातील अग्रसेन भवन येथे सकाळी ११ वाजता उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अड.घन:श्याम निंबाजी पाटील होते.तहसीलदार अनिल गावीत,पी.आय.अवतारसिंग चव्हाण,तापी सहकारी सूतगिरणी चे संचालक तुकाराम पाटील यावेळी उपस्थिती देऊन सर्व फोटोग्राफर बंधूंना शुभेच्छा दिल्या.यांचे स्वागत छोटू वारडे यांनी केले.कार्यक्रम प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.यावेळी चो.सा.का.चे माजी चेअरमन एड.घनश्याम पाटील,चोपडा नगर परिषदेचे गटनेते जीवन भाऊ चौधरी, साहित्यिक तथा कवी अशोक निळकंठ सोनवणे, नगरसेवक गजेंद्र जयस्वाल,वर्डी येथील सामाजिक कार्यकर्त्या विमलताई भिल,विमा व्यवसायातील अग्रणी मनीष तायडे,भूषण शैदाणे,गोपाळ सोनवणे आदिनी उपस्थिती दिली.केंद्र सरकारच्या पोस्ट खात्याने एक वर्षाचे 399 रुपये प्रीमियम भरून एक वर्षाच्या दहा लाखाचा विमा योजना सुरू केली आहे.याबाबत भूषण शैदाणे यांनी मार्गदर्शन केले.पटेल फोटो स्टुडिओचे संचालक भाऊसाहेब राजेंद्र पाटील,अजहर तेली,कैलास सोनवणे,मुजम्मील शेख,रईस शेख,जाकीरभाई शेख,कुणाल महाजन,बापू महाजन,विनोद महाजन,राहूल सोनवणे,जावेद शेख,योगेश राजपूत,संजय सोनवणे,प्रशांत चांदे,युनूस भाई,जानकिराम कोळी,योगेश बैरागी,जुबेरभाई,योगेश शर्मा,शुभम महाजन,अरुण कोळी,आसिफभाई,भूषण कोळी,राकेश महाजन,उमेश पाटील,सागर महाजन,आकाश विसावे,अन्नू सोनवणे,कृष्णा जाधव,शकलिन शेख,शाहरूख शेख,भिकण राजपूत,टिणू सोनवणे,गोपाल धनगर,अर्जुन कोळी,सुरेश चौधरी,अरुण कोळी,अक्षय राजपूत,राकेश राजपूत, शाकीर शेख आदींनी उपस्थितांचे स्वागत केले.यावेळी फोटोग्राफी व्यवसायाचे नवे स्वरूप व आगामी काळात फोटोग्राफर बांधवांनी या व्यवसायात झालेले बद्दल संदर्भात मान्यवरांनी आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन आभार प्रदर्शन लेखक,कवी तथा साहित्यिक रमेश जे.पाटील यांनी केले.
