'मन की बात'* आणि *'बूथ सशक्तिकरण अभियान'"लासूर-घोडगाव जि.प.गटाची आढावा बैठक 'वेळोदा' येथे संपन्न.."
चोपडा दि.२१(प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या आदेशानुसार चोपडा तालुक्यातील भारतीय जनता पार्टी च्या 06 गटातील बैठका आयोजित करण्यात आल्यात, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन,भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. राजुमामा भोळे. उत्तर महाराष्ट्र चे विभागीय संघटन मंत्री रवि जी अनासपूरे यांच्या मार्गदर्शनाने चोपडा तालुक्यात भारतीय जनता पार्टी कडून लासूर घोडगाव जि.प.गटाची बैठक वेळोदे येथे श्रीराम मंदिर सभागृहात संपन्न झाली..*
*देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी साहेब महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात कार्यक्रमात विविध विषयावर देशवासियांशी संवाद साधतात..*
आगामी दि.28 आॅगस्ट रोजी होणारा 'मन की बात' कार्यक्रम
सर्व शक्तीकेंद्रातील बुथ वर मोठ्या संख्येने सहभागी होऊन संपन्न करावा याबाबत नियोजनासाठी आढावा बैठक संपन्न झाली..
तसेच *'बूथ सशक्तीकरण अभियानां अंतर्गत आढावा' घेतला गेला*, सर्व शक्तीकेंप्रमुखांना जबाबदारी दिलेल्या बूथ प्रमुख व सदस्यांना सोबत घेऊन संघटन मजबूत करण्यासाठी या आढावा बैठकीत चर्चा झाली..
या बैठकीत तालुकाध्यक्ष पंकज पाटील यांनी उपस्थित शक्तीकेंद्र प्रमुख,लोकप्रतिनिधी,पदाधिकारी यांना या दोन्ही विषयावर तसेच विविध विषयावर मार्गदर्शन केले..
यावेळी 'मन की बात' कार्यक्रम तालुका संयोजक भरत सोनगिरे सर,ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस विनायक पाटील,किसान मोर्चा तालुकाध्यक्ष अंबादास सिसोदिया,ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष तथा कुसुंबा शक्तीकेंद्र प्रमुख कांतिलाल पाटील,विटनेर शक्तीकेंद्र प्रमुख सुभाष कोळी,लासुर शक्तीकेंद्र प्रमुख विठ्ठल पाटील,गणपूर शक्तीकेंद्र प्रमुख जितेंद्र पाटील,
जेष्ठपदाधिकारी दिलिप पाटील,अरविंदसिंग सिसोदिया,विकास पाटील,दत्तात्रेय पाटील,संतोष धिवर,संजय कोळी,कमलेश सैंदाणे,मोतिलाल सोनवणे,निलेश पाटील,राजेंद्र पाटील,रामकृष्ण पवार,धनराज नेरपगारे,मयुर सुतार,आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..

